• bdokalmeshwar2012@gmail.com
  • 0711882751

Last Update : 17/07/2025

service photo

विभाग प्रमुखाचे पदनाम :- सहायक प्रशासन अधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- 9765157354

विभागाचा ईमेल :- bdokalmeshwar2012@gmail.com

सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषद, नागपूरचा एक महत्त्वाचा विभाग आहे.

या विभागामार्फत जिल्हा परिषद, नागपूरमधील वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, पदोन्नती आणि बदल्यांवर नियंत्रण ठेवले जाते. त्याचप्रमाणे वाहन व्यवस्थापन, भ.नि.नि., निवृत्ती वेतन, खातेनिहाय चौकशी, गोपनीय अहवालांची तयारी, तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी यांसारखी महत्त्वाची कामेही या विभागाद्वारे पार पाडली जातात.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) तसेच सर्व गट विकास अधिकारी यांच्या पगार, भत्ते आणि सेवाविषयक इतर कामकाजाची देखरेख करण्याची जबाबदारीही या विभागावर असते. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने सर्व विभागांची रचना, कार्यपद्धती निश्चित करणे व पंचायत समित्यांचे निरीक्षण करण्याची कामेही या विभागातून केली जातात.

या विभागातील नोंदणी शाखेमार्फत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे येणारे सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे पत्रव्यवहार, तसेच मा. लोकायुक्त, मा. लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून प्राप्त होणारे पत्र स्वीकारले जातात आणि नंतर संबंधित अंतर्गत विभागांकडे वितरित केले जातात.

याशिवाय, विभागप्रमुख, पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी आणि ग्रामीण स्तरावरील इतर अधिकाऱ्यांच्या समन्वयासाठी आयोजित होणाऱ्या सभांचे आयोजन देखील या विभागामार्फत केले जाते.